अहमदनगर ब्रेकिंग! ३३ प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली, बसला आगही लागली
Breaking News | Ahmednagar Acccident: नगर-पुणे महामार्गावर चासजवळ झालेल्या अपघातात रस्त्यावरच उलटलेली खासगी आराम बस.
नगर: नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) गावाच्या पुढील बाजूस असलेल्या वळणावर भरधाव असलेली खासगी आराम बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. हा अपघात मंगळव- ारी (दि. ३०) सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. या बसमध्ये सुमारे ३३ प्रवासी होते. ते सुदैवाने या बचावले असून, बसचा क्लीनर गंभीररीत्या जखमी झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरकडून नगरमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या बिंदुसरा एक्सप्रेस नावाच्या (एमएच २०, डीडी ०२२३) या बसला हा अपघात झाला आहे. बस रस्त्यावर उलटल्यानंतर प्रवाशांनी मोठा आरडाओरडा केला. अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्यांना त्यांनी तत्काळ बाहेर काढत किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना चास येथील रुग्णालयात हलविले, तर गंभीर जखमी झालेल्या क्लीनरला उपचारासाठी नगरला हलविण्यात आले.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
बस रस्त्यावर उलटल्यानंतर बसच्या एका बाजूला आगही लागली होती. मात्र, सिद्धांत आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे ही आग आटोक्यात आली. बस रस्त्यावर उलटल्याने एका बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. क्रेनच्या सहाय्याने बस रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले.
Web Title: bus carrying 33 passengers overturned, the bus also caught fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study