बसचा अपघात; दुचाकीला चिरडत झाडाला धडक, दुचाकीस्वार ठार
Satara Accident: बसने मोटरसायकलला चिरडत झाडाला धडकत हा अपघात.
सातारा: जिल्ह्यातील वडूज-खटाव रोडवरील जाधव वस्तीजवळ भरधाव बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. वेगात जाणारी बसने मोटरसायकलला चिरडत झाडाला धडकत हा अपघात झाला. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचं माहिती मिळत आहे.
एसटी बस झाडावर आदळल्याने एसटीतील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींना साताऱ्याकडे हलवण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
Web Title: Bus accident The bike crushed the tree and the bike rider was killed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App