संगमनेरात सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, राजीनाम्याची मागणी
Sangamner Burning: अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका.
संगमनेर: राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक झाले. सोमवारी (दि. ७) नाशिक-पुणे महामार्गावर हिवरगाव पावसा येथील टोलनाका परिसरात कृषिमंत्री सत्तार यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन (burn) करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय भालेराव, शहराध्यक्ष राहुल वर्पे, किरण घोटेकर, मनीष माळवे, अमोल राऊत, नितीन आहेर, गजानन भोसले, प्रसाद काळे, अशोक काळे, तुषार वाळे, विकी पवार, शशिकांत पवार, गणेश गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.
बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवार म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. सत्तार यांनी माफी मागितली असली तरीही त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. जोपर्यंत ते राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्या अहमदनगर जिल्ह्यात फिरू देणार नाहीत.
Web Title: Burning of symbolic effigy of Sattar at Sangamaner
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App