अकोले तालुक्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी घरफोडी
Akole News: दोन घरे फोडून (Burglary) रक्कम व मुद्देमाल लंपास केल्याची घटना.
अकोले: तालुक्यात मन्याळे ता. अकोले येथे दोन घरे फोडून रक्कम व मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. याबाबत अकोले तालुका पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्याद दाखल करण्यात आलेल्या आहेत.
पहिली फिर्याद याबाबत राजेंद्र बाबुनाथ हांडे वय ५१ वर्ष धंदा शेती, रा. मन्याळे ता. अकोले यांनी दाखल केली आहे. मी वरील ठिकाणी घरात पत्नी मंगल राजेंद्र हांडे आसे आम्ही एकत्र राहातो व शेती व्यावसाय करून उपजिवीका करतो. माझा मुलगा सुमित हा पुणे येथे कामा निमीत्त राहात ससुन तो आधुन मधुन गावी मन्याळे येथे येत जात असतात. सध्या आमचे घराचे शेजारी मी निवीन घर बांधणी करण्यास सुरवात केली असून त्या साठी मी माझ्या शेतातील व माझ्या साठवणुकीतील पैसे मी बॅकेतून काढून आणले होते. सदर चे खाते ब्राम्हणवाडा ता. अकोले येथे असून त्या मध्ये मी माझे शेताचे पैसे बचत खात्यात जमा करीत असतो.
दिनांक १२/०३/२०२३ रोजी मी व माझी पत्नी मंगल आम्ही आमचे नविन घराचे व शेतातील काम धंदा आटोपुन रात्री ०८.०० वा. चे सुमारास माझी पत्नी मंगल ही आमचे शेजारील बाया माणसांन बरोबर आमचे मन्याळे गावात सप्ताहाचे कार्यक्रमाला गेली होती. त्या नंतर मी बाहेरील कामधंदा आटोपुन रात्री ०९.०० वा. गावातच सप्ताहाचे कार्यक्रमाला माझी मोटार सायकल घेवून गेलो होतो. त्या नंतर गावात सप्ताहा मध्ये बाई माणसांचे जेवण झाल्या नंतर पत्नी मंगल ही तीचे बरोबर आसलेल्या महीलांसह घरी निघुन आली होती. त्या नंतर गडी माणसांचे जेवण खावण झाल्या नंतर मी माझी मोटार सायकल घेवून रात्री १०.०० वा. घरी पोहचलो तेव्हा मी घराचे दरवजा जवळ गेलो असता तेव्हा मला आमचे राहाते घराचे दरवाजा उघडा दिसुन आला तेव्हा मी व माझी पत्नी आसे आम्ही आमचे घराचे आत मध्ये जावून पाहीले आसता तेव्हा आमचे घरातील धान्याची कोठी चे झाकन उघले दिसले तेव्हा आम्ही त्या मध्ये ठेवेलेले माझे पत्नीचे सोन्याचे दागीने पाहीले आसता ते तेथे दिसुन आले नाही. तेव्हा आम्ही कपाटातील पैसे आहेत का याची खात्री केली आसता तेव्हा आम्हाला कपाटातील पैसे दिसुन आले नाही तेव्हा आमची खात्री झाली की, कोणी तरी अज्ञात चोरटयाने आमचे घराचे दरवाजाला लावलेले कुलुप पढवीत ठेवलेल्या चावीने काढून आत जावुन सामानाची उचकापाचक करून कोठीतील सोन्याचे दागीने व कपाटातील रोख रक्कम चोरून नेले आहेत. त्याचे वर्णन खालील प्रमाणे,
१] १,००,०००/ रुपये त्यात ५००/रु दराच्या नोटी, दोन बंडल. २५०,०००/रु किमतीचे सोन्याचे दागीने, एक राणी हार, नेकलेस, कानातील झुबे, मंगळसुत्र, आसे एकणु ५ तोळे वजनाचे कि. अं. जु. वापरते. एकूण १,५०,०००/रु येणे प्रमाणे वरील किमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ही दिनांक १२/०३/२०२३ रोजी रात्री ०९.०० वा ते रात्री १०.०० वा चे सुमारास कोणीतरी आज्ञात चोरटयाने आमचे घराचे कुलुप चावीने उघडुन आत प्रवेश करून घरतील धान्याचे कोठीतील सोन्याचे दागीने व कपाटील रोख रक्कम चोरुन नेली आहे.
तसेच माझ्या घराचे शेजारी राहाणारी माझी बहीन मिराबाई बाबुनाथ हांडे वय ६० वर्ष रा. मन्याळे ता. अकोले हीचे घराचा दरवजा उघडुन आत प्रवेश करून तीचे घरातील तीने ठेवलेले ९ हाजार रूपये चोरून नेले आहेत. त्या बाबत मी व माझी बहीन पोलीस स्टेशन ला येवुन आज्ञात चोरटया विरुध्द बहिण हिने तक्रार दाखल केली आहे.
दुसरी फिर्यादी मिराबाई बाबुनाथ डांडे वय 55 वर्ष धंदा शेती रा मन्याळे ता अकोले जि. अ.नगर, मी शेती व्यावसाय करते. माझे घर मन्याळ गावचे शिवारात आसुन माझ्या शेजारी माझा लहान भाऊ बाबुनाथ हांडे यांचे घर असुन तेथे तो त्याच्या कुटुंबासह राहतो. माझी बहिण सुशिला एकनाथ पाडेकर नाशिक येथे राहत आहे
दि. 1/05/2023 रोजी सकाळी 10.00 वा चे सुमारास माझ्या राहते घराचे दरवाज्यात लावून माझी बहिण सुशिला एकनाथ पाडेकर रा नाशिक हिचेकडे गेले होते. आज दि 13/03/2023 नासिक येथून येत असताना मला माझा भाऊ बळवंत लक्ष्मण हांडे याने फोन करुन सागितले की का 12/3/2023 रोजी रात्री 08.00 वा तुझे घराचा दरवाजा व्यवस्थीत लावलेला होता लावलेला परत दिनांक 12/03/2023 रोजी सकाळी 07/00 वा पाहिले असता तुझे घराचा दरवाजा उघडा दिसून आहे असे सांगितल्याने नी माझे घरी दुपारी 2.00 वा चे सुमारास माझे राहते घरी मन्याळे येथे आले. मला माझ्या घराचा दरवाजा उघडा होता व कुलुप तोडुन खाली पडलेले होते, त्यानंतर मी घरात जादून आसता घरातील संसारउपयोगी सामान आस्थवेस्थ पडलेले होते. म्हणुन मी माझे घरातील कोटली ठेवलेले बँकेचे पुस्तकामध्ये ठेवलेले पैसे बघितले आसता बँकेच्या पुस्तकामध्ये ठेवलेले पैसे मिळुन आले नाही म्हणून मी माझ्या घरात पैशाचा शोध घेतला आसता पैसे मिळुन आले नाही म्हणुन माझी खात्री झाला की अज्ञात चोरटयाने मी घरी नसतांना माझे बंद घराचा दरवाज्याचे कुलुप तोडुन घरामध्ये प्रवेश करून माझे पुस्तकामध्ये ठेवलेले पैसे चोरून नेले आहे. त्यानंतर मला माझा चुलत भाऊ बळवंत लक्ष्मण हांडे याने को करून सांगितले की माझे घराचे जवळच राहणारा माझा भाऊ राजेंद्र बाबुनाथ हांडे यांचे घरीदेखील झालेली आहे. असे मला समजले आहे. तरी चोरीस गेलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे 2) 9,000/- रुपये रोख रक्कम त्यात 500 रुपये दराच्या नोटा येणेप्रमाणे वरील वर्णनाची रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने दिनांक 12/03/9/25 रोजी रात्री 08/00 ते दिनांक 13/03/2023 सकाळी 07.00 वा चे सुमारास माझे घराचा दाख उघडून आत प्रदेश करुन चोरुन नेले आहे तसेच माझे शेजारी राहणारा माझा भाउ राजेंद्र बाबुनाथ हा घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश करून त्याचे घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार तळपे हे करीत आहे.
Web Title: Burglary at two places in Akole taluka on the same day
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App