सराफा व्यवसायिक पिता पुत्राची आत्महत्या
Nashik Suicide: सराफा व्यावसायिक पिता-पुत्राने राहत्या घरात सोमवारी (दि. १३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.
पंचवटी : नाशिकच्या सराफा बाजारात असलेल्या ए. एस. गुरव अँड सन्स सराफा दुकानाचे संचालक असलेल्या सराफा व्यावसायिक पिता-पुत्राने राहत्या घरात सोमवारी (दि. १३) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशांत आत्मारामशेठ गुरव (४९) व अभिषेक प्रशांत गुरव (२८) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण पंचवटीसह सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशांत गुरव अभिषेक गुरव दरम्यान, या दोघाही पिता-पुत्रांनी आत्महत्या का केली, याचे मुख्य कारण गुलदस्त्यात असले, तरी गुरव कुटुंबीयांवर असलेल्या लाखो रुपयांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दोघांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी परिसरात चर्चा आहे.
या सराफा पिता-पुत्राच्या आत्महत्येबाबत पोलिसांकडून पुरावे गोळा केले जात आहेत. त्यांचे मोबाइल, सोशल मीडिया खाते तपासण्यात येत आहे. दिवसभर पोलिसांकडून तपास सुरू होता. कुठे काही आक्षेपार्ह बाब लक्षात आल्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
गुरव यांनी त्यांच्या लॉकरमध्ये एक चिठ्ठी लिहिलेली असून, ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर, त्यामध्ये असलेल्या मजकुरातून पुढे येणाऱ्या माहितीवरून उजेडात येईल. गुरव यांच्यापश्चात पत्नी, मुलगी व मुलगा असून, गुरव यांच्या पत्नी कर्नाटक राज्यात देवदर्शनासाठी गेलेल्या होत्या, तर त्यांची मुलगी सांगली जिल्ह्यात सासरी आहे. घरामध्ये पिता-पुत्र हे एकटेच होते.
Web Title: Bullion business father son suicide
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News