Budget 2020: सीतारामन यांचा नवा विक्रम, ९१ अर्थसंकल्पामध्ये कोणीही केला नाही
नवी दिल्ली(Budget 2020): आज संसदेत निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना २ तास ३९ मिनिटे भाषण केले. अर्थसंकल्प भाषण सकाळी ११ वाजता त्यांनी सुरुवात केली. त्यांनी अडीच तासांपेक्षा जास्त वेळ भाषण केले. त्यामुळे सर्वाधिक मोठ अर्थसंकल्पीय भाषण दिल्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला आहे.
जसवंत सिंह यांनी २००३ मध्ये अर्थ संकल्प मांडला होता. त्यावेळी त्यांनी २ तास १३ मिनिटे भाषण केले होते. त्यांचा विक्रम आज निर्मला सीतारामन यांनी मोडला आहे. गेल्या ७३ वर्षामध्ये ९१ अर्थसंकल्प सादर झाले त्यात सर्वात मोठ अर्थसंकल्पीय भाषण त्यांनी दिले. मात्र तरीही त्यांची प्रकृती बरी नसल्याने शेवटची दोन पाने त्यांना वाचता आली नाही. सलग दोन वर्ष अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. याअगोदर इंदिरा गांधी यांनी दोनदा अर्थसंकल्प मांडला आहे.
सर्वाधिक वेळ भाषण करणारे अर्थमंत्री पुढीलप्रमाणे:
२०२०: निर्मला सीतारामन – २ तास ३९ मिनिटे
२००३: जसवंत सिंह – २ तास १३ मिनिटे
२०१४: अरुण जेटली – २ तास १० मिनिटे
२०१९: निर्मला सीतारामन – २ तास ५ मिनिटे
वाचा: संगमनेर तालुक्यातील घटना: पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर
शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536
Website Title: Budget 2020 nirmla Sitaraman Record