BS Yediyurappa Resign: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांचा राजीनामा
कर्नाटक | BS Yediyurappa Resign: कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. बऱ्याच काळापासून राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती. अखेर आज त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
मागील आठवड्यात बी.एस.येडीयुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप प्रदेशाध्यक्ष जे.पी. नद्डा यांची भेट घेतली होती.
२०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका होणार आहेत. बी.एस.येडीयुरप्पा यांचं सध्याचं वय लक्षात घेता भाजपच्या हायकमांडने निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
वाढतं वय आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बी.एस.येडीयुरप्पा यांच मुख्यमंत्री पद जाण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदींशी भेट झाल्यानंतर बी.एस.येडीयुरप्पा यांनी राजीनामा देण्याचे म्हंटले आहे. आज बी.एस.येडीयुरप्पा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांचीही भेट घेतली. या भेटीतही बी.एस.येडीयुरप्पा यांनी राजीनाम्याचा मुद्दा काढला.लवकरच पुढील मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतला जाईल.तोपर्यंत बी.एस.येडीयुरप्पा मुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Web TItle: BS Yediyurappa Resign