ब्रेकिंग: सहायक पोलीस निरीक्षकाचा निर्घृणपणे खून
Brutally Murder Assistant Police Inspector: एका निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्याची घटना.
सोलापूर: रात्री जेवण करून रस्त्यावर शतपावली करीत असताना एका निलंबित सहायक पोलीस निरीक्षकाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार हत्याराने हल्ला करून निर्घृणपणे खून केल्याची घटना सांगोला तालुक्यात घडली आहे. सूरज विष्णू चंदनशिवे (वय ४२) असे खून झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सांगली येथील गुन्हे शाखेत पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना एका मोठ्या आर्थिक गुन्ह्यात निलंबित झालेले चंदनशिवे हे सांगोला शहरापासून जवळच असलेल्या स्वतःच्या वासूद गावात राहात होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री घरात जेवण करून वासूद-केदारवाडी रस्त्यावर शतपावली करण्यासाठी गेले असताना तेथे दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून चंदनशिवे यांच्या तीक्ष्ण हत्याराने खून केला. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता सकाळी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात चंदनशिवे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सहायक पोलीस निरीक्षकाचे निलंबन:
फौजदार चंदनशिवे हे सांगलीत नेमणुकीस असताना एकामोठ्या आर्थिक गुन्ह्यात हस्तगत केलेल्या रकमेपैकी पोलिसांनी सुमारे नऊ कोटी रूपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी निलंबित (Suspended) झाले होते. यात चंदनशिवे यांचाही समावेश होता. सध्या त्यांची नेमणूक सांगली पोलीस मुख्यालयात होती.
Web Title: Brutally Murder Assistant Police Inspector
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App