तरुणीवर पाशवी अत्याचार, नराधम रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या
Mumbai Crime: घरातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निघालेल्या एका तरुणीला फूस लावून रिक्षातून अर्नाळा येथे आणून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला बेड्या.
मुंबई : घरातून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निघालेल्या एका तरुणीला फूस लावून रिक्षातून अर्नाळा येथे आणून तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. राजरतन वायवळ (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे.
२२ जानेवारीला रात्री उशिरा एक तरुणी राम मंदिर रेल्वेस्थानकाबाहेर रडत होती. तिला पाहून एका व्यक्तीने तिची चौकशी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या तरुणीला सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्या गुप्तांगातून डॉक्टरांनी सिझेरियनचे ब्लेड आणि दगडाचे तुकडे बाहेर काढले.
नैराश्यातून घर सोडले
वडिलांच्या रागीट स्वभावामुळे आलेल्या नैराश्यातून तरुणी घरातून निघून गेली होती, असे पोलिस तपासात समोर आले आहे. नालासोपारा येथे एका रिक्षाचालकाने तिची विचारपूस केल्यानंतर तिने आपल्याला आत्महत्या करायची आहे, असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला अर्नाळा येथे आणून तिच्यावर अमानुष अत्याचार केले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली.
Web Title: Brutal abused on young woman, killer rickshaw driver
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News