Home पुणे धक्कादायक! भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत

धक्कादायक! भावाने केला बहिणीचा गळा दाबून खून, मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत

Breaking News | Pune Crime: १६ वर्षीय बहिणीचा १८ वर्षीय भावाने गळा दाबून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.

Brother strangles his sister in Pune

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील वैदूवाडी भागात १६ वर्षीय बहिणीचा १८ वर्षीय भावाने गळा दाबून खून केल्याची घटना घडल्याने वैदूवाडी भागात एकच खळबळ उडाली आहे. साफीया सुलेमान अन्सारी वय १६ असे खून झालेल्या बहिणीच नाव आहे .तर शारीख सुलेमान अन्सारी वय १८ असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrested) केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  हडपसर भागातील वैदूवाडी भागात आरोपी भाऊ शारीख सुलेमान अन्सारी, मयत बहीण साफीया हे कुटुंबीया सोबत राहत होते. पण मयत साफीया ही सतत आजारी असायची, त्यामुळे ती घरातील कोणावरही अचानकपणे अंगावर जायची, साफीया ही भाऊ शारीख याच्या अंगावर १७ जून रोजी गेली. यामध्ये दोघांमध्ये भांडण झाली आणि त्यात भाऊ शारीख याने साफीया हिचा गळा दाबला. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

त्यानंतर आरोपी शारीख याने साफीया हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला. याबाबत पोलिसांना दिल्यानंतर तो मृतदेह खाली काढण्यात आला. मात्र तपासाअंती आरोपी भाऊ शारीख अन्सारी याने कबुली दिली असून या घटनेचा अधिक तपास हडपसर पोलिस करीत आहे.

Web Title: Brother strangles his sister in Pune

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here