Home महाराष्ट्र परप्रांतातील महिलांना आणून वेश्या व्यवसाय, लॉजवर छापा

परप्रांतातील महिलांना आणून वेश्या व्यवसाय, लॉजवर छापा

Breaking News | raid the prostitution business: परप्रांतातील महिलांना आणून वेश्या व्यवसाय करणाऱ्या कुंटणखान्यावरील अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

Bring women from the province and raid the prostitution business, lodges

कऱ्हाड : परप्रांतातील महिलांना आणून वेश्या व्यवसाय करणाऱ्या कुंटणखान्यावरील अड्डयावर पोलिसांनी काल सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. ओगलेवाडी येथील सम्राट लॉजवर झालेल्या कारवाईत दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी येथील सम्राट लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्या लॉजवर डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी त्याची खात्री केली. त्या वेळी तेथे महिला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

सायंकाळी त्या लॉजवर छापा टाकण्यात आला. त्या वेळी तेथे हॉटेल व्यवस्थापक व महिला एजंट सापडले. त्यांनी त्यांच्यामार्फत महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे आढळले. त्यात दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये साईराज पाटील, विशाल अवधूत, मुसा जमादार, महिला एजंट शहनाज मुलाणी यांच्यावर कारवाई सुरू आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई केल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Bring women from the province and raid the prostitution business, lodges

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here