Home अहमदनगर दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर, पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री अन….

दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर, पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री अन….

Ahmednagar News: पहिली पत्नी हयात असताना दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाला चांगलीच अद्दल घडवली आहे. वराची वरात थेट पोलीस ठाण्यात नेल्याची घटना समोर आली आहे.

Bridegroom who climbs the Bohla for marriage. The bride and groom directly to the police station

अहमदनगर : पहिली पत्नी हयात असताना घटस्फोट न देता दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पहिल्या पत्नीने चांगलाच धडा शिकवला. लग्न घटिकाजवळ येत असताना आणि वधू-वर बोहल्यावर चढत असतानाच पहिल्या बायकोची लग्नात एन्ट्री झाली आणि लग्नात एकच गोंधळ उडाला. अखेर हे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हणत पहिल्या पत्नीने आपल्या पतीचे दुसरे लग्न रोखून नियोजित वराची वरात थेट पोलीस ठाण्यात नेल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तीस वर्षीय महिलेला माहिती मिळाली की आपला पती विशाल पवार हा अहमदनगर इथे जाऊन दुसरे लग्न थाटामाटात करत आहे. ही माहिती समजताच पत्नीने आपला बारा वर्षांचा मुलगा आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले. नगरमध्ये आल्यानंतर संबंधित मंगल कार्यालयाचा पत्ता शोधून बरोबर लग्न लागायच्या आधी काही मिनिटे आपल्या पती समोर पोहोचली आणि तिथून पुढे या लग्नात चांगलाच राडा झाला. पहिल्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या नियोजित वधूला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे पहिल्या पत्नीने पोलिसांसह लग्नात एन्ट्री मारली.

दरम्यान नववधूचे वडील आणि पहिल्या पत्नीच्या कुटुंबियांमध्येही चांगलाच राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत पहिली पत्नी तिचा पती यांना पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर विशाल पवार याच्यावर त्याच्या पहिल्या पत्नीने गुन्हा दाखल केला असून कोणताही कायदेशीर घटस्फोट न घेता आणि एक मुलगा असताना सुद्धा आपल्या पतीने दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करुन एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. मात्र, त्या ठिकाणी वेळेत पोहोचल्याने तो लग्न सोहळा थांबविण्यात आला असून पतीने फसवून दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न केला असल्याबद्दलचा गुन्हा अहमदनगरच्या तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विशाल गोरखनाथ पवार याच्याविरुद्ध भादंवि कलम 494 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Bridegroom who climbs the Bohla for marriage. The bride and groom directly to the police station

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here