Home अहिल्यानगर अहिल्यानगर: कंटेनरच्या धडकेत नववधूचा मृत्यू

अहिल्यानगर: कंटेनरच्या धडकेत नववधूचा मृत्यू

Breaking News | Ahilyanagar Accident: कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात नववधू जागीच ठार .मयत तरुणी विद्यापीठातील पीएच.डी.ची विद्यार्थी.

Accident Bride dies in container collision

राहुरी: कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात नववधू जागीच ठार झाली. पंधरा दिवसांपूर्वी विवाह झालेली नववधू शुक्रवारी (दि. २७) दुपारी नगर- मनमाड महामार्गावरून जात असताना कृषी विद्यापीठाजवळ झालेल्या अपघातात तीचा मृत्यू झाला.

सुचिता आधाटे (वय २८, रा. पुणे) असे मयत नववधूचे नाव आहे. ती कृषी विस्तार विभागात पीएच.डी. तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती. रविवारी (दि. ८ जून) या तरुणीचा विवाह झाला होता. लग्नानंतर ती पुन्हा विद्यापीठ येथे होस्टेलवर आली. शुक्रवारी (दि. २७)

दुपारी सुचिता ही तिच्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच १४ एलएन २८०९) विद्यापीठ येथील पेट्रोल पंपावर जात होती. नगरकडून राहुरीकडे येत असलेल्या कंटेनरने (टीएन ५९ डीएक्स ३१५७) सुचिता हिच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी तिच्या डोक्याला जबर मार लागून ती जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्यासह महिला सुरक्षारक्षक पूजा पवार, वर्षा नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तीला शासकीय वाहनातून अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथकाने अपघातग्रस्त वाहने व कंटेनरचालकाला ताब्यात घेतले. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Breaking News: Accident Bride dies in container collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here