Home अहमदनगर खासगी ठेकेदारास ५१ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

खासगी ठेकेदारास ५१ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

Ahmednagar Bribe Case: जादा अधिभारसाठी लाखाची मागणी : लाच घेताना रंगेहाथ पकडला.

bribery while taking a bribe of Rs 51 thousand to a private contractor

राहुरी:  देवळाली प्रवरा येथील एकाने व्यवसायासाठी वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतले होते. त्याच कनेक्शनमधून जास्त लोड म्हणजे जादा अधिभार हवा होता. यासाठी देवळाली प्रवरा येथील खासगी ठेकेदारास ५१ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ पकडले आहे. सुधीर भास्कर पठारे (वय ३४, रा. देवळाली प्रवरा) असे या खासगी लाचखोर ठेकेदाराचे नाव आहे.

याप्रकरणी त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार यास त्याच्या व्यवसायाकरिता वापरात असलेल्या वीज कनेक्शन मीटरचे १५ एचपीवरून ४० एचपी लोड वाढवून देण्याच्या मोबदल्यात ठेकेदार सुधीर पठारे याने तक्रारदाराला ३ रोजी १ लाख २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी लाचेच्या रकमेच्या अर्धी रक्कम म्हणजे ५१ हजार रुपये काम सुरू करण्यापूर्वी ५ डिसेंबर रोजी पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली. म्हणून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८चे कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम

दरम्यान, लाचेच्या जाळ्यात खासगी ठेकेदाराबरोबर देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या एका कनिष्ठ अभियंत्याचा या प्रकरणात समावेश असल्याची चर्चा सोमवारी सायंकाळपासून देवळाली व फॅक्टरी परिसरात सुरू होती. मात्र, याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधीर पठारे या ठेकेदारावरच गुन्हा दाखल झाल्याने ती केवळ अफवाच ठरली.

Web Title: bribery while taking a bribe of Rs 51 thousand to a private contractor

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here