Home बीड लाच घेऊन पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याने ठोकली धूम; पण…

लाच घेऊन पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याने ठोकली धूम; पण…

अपहरणाच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच (Bribe).

bribe to avoid arrest in the case of kidnapping 

बीड : अपहरणाच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली. पैकी दहा हजार रुपये केली. घेताना पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर एसीबीच्या टीमने पाठलाग करत दोघांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे परिसरात करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लक्ष्मण कनलाल कीर्तने (वय ३४) हे पीएसआय असून रणजित भगवान पवार (वय ४२) हे हवालदार आहेत. दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली. कार्यरत आहेत. कीर्तने हे साधारण तीन महिन्यांपूर्वीच बीड जिल्ह्यात बदलून आले आहेत. मागील आठ दिवसांपूर्वी एका अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास कीर्तने यांच्याकडे होता. यात तीन आरोपी होते. या सर्वांना अटक न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली.

कारवाई आधीच म्हणजे मंगळवारी सकाळीच त्यांनी १० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर आणखी ८ हजार रुपये घेतले. पुन्हा पैशांची मागणी केल्याने एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्याप्रमाणे एसीबीने सापळा रचत या दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला. कीर्तने व पवार हे दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी १० हजार रुपये घेत लगेच धूम ठोकली. त्यानंतर एसीबीच्या टीमने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून लाचेची रोख १० हजार रुपयांची रक्कमही जप्त केली.

नाशिक: नाशिक मध्ये लाचखोरीचे प्रमाण अधिक वाढले आहे.. असं असताना देखील लाच घेताना इतर कचरताना दिसत नाही. अशातच एसीबीच्या जाळ्यात नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना  जाळ्यात अडकले आहेत. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे.

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असून येवला शहर पोलीस स्टेशन येथे नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व एक पोलीस कॉन्स्टेबल हे 50 हजार रुपयाच्या लाच प्रकरणात जाळ्यात सापडले आहे. तक्रारदार याच्या भावावर दाखल गुन्ह्यात आणखी कलमे वाढवू नये ,यासाठी ही लाच मागितल्याचे समोर येत आहे. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि पोलिस शिपाई सतिश बागुल अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Web Title: bribe to avoid arrest in the case of kidnapping 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here