अटक न करण्यासाठी घेतली एक हजाराची लाच
Breaking News: दाखल गुन्ह्यात भविष्यात मदत करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक एक हजाराची लाच (Bribe)स्वीकारताना रंगेहाथ.
लातूर : भांडणाच्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना अटक न करता सोडून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला आणि दाखल गुन्ह्यात भविष्यात मदत करण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक युवराज बालाजी जाधव यांना एक हजाराची लाच स्वीकारताना बुधवारी पथकाने पकडले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तक्रारदार यांनी दयानंद कॉलेज गेट पोलिस चौकी येथे जाऊन एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो. ना. युवराज जाधव यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम एक हजार रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारल्याने त्यांना जागीच रंगेहाथ पकडले.
Web Title: A bribe of one thousand was taken to avoid arrest
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News