Home अहमदनगर अहमदनगर: दीड हजारांची लाच; वसुली सहायक पकडला रंगेहाथ

अहमदनगर: दीड हजारांची लाच; वसुली सहायक पकडला रंगेहाथ

Breaking News | Ahmednagar: वसुली सहायकास दीड हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

bribe of one and a half thousand Recovery assistant caught red-handed

अहमदनगर : राहुरी तहसील कार्यालयातील वसुली सहायकास दीड हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. सुनील भागवत भवर (वय ४६, रा. वर्ग ३) असे वसुली सहायकाचे नाव आहे.

तक्रारदार यांची राहुरी तालुक्यातील रामूपर येथे दीड एकर शेतजमीन आहे. त्यापैकी ३० गुंठे क्षेत्रावर महाराष्ट्र शासनाचे नाव लागलेले होते. शासनाचे नाव कमी करून तसे पत्र देण्यासाठी महसूल सहायक भवर याने दोन हजारांची लाच मागितली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली.

त्यानुसार पथकाने राहुरी तहसील कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी महसूल सहायक भवर यास लाच

स्वीकारताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस निरीक्षक छाया देवरे, पोलिस नाईक चंद्रकांत काळे, सचिन सुद्रीक, दशरथ लाड आदींच्या पथकाने केली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: bribe of one and a half thousand Recovery assistant caught red-handed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here