Home क्राईम शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात

Nashik Crime: शालार्थ क्रमांक प्रस्तावाच्या मंजूरीसाठी ५० हजारांची लाच (Bribe) स्वीकारणाऱ्या कनिष्ठ लिपिकास अटक (Arrested).

Bribe Case Clerk in the office of the Deputy Director of Education in the network of ACB

नाशिक : शालार्थ क्रमांक प्रस्तावाच्या मंजूरीसाठी ५० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कनिष्ठ लिपिकास एसीबीने बेड्या ठोकल्या. ही कारवाई नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात करण्यात आली. याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते. नाशिकमधील लाच प्रकरणे काही थांबण्याचे नाव घेत नाही. 

दिगंबर अर्जुन साळवे (५५ रा. भीमशक्तीनगर, टाकळी) असे संशयिताचे नाव आहे. तक्रारदार हे १३ डिसेंबर २०१९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान नाशिक शहरातील एका खासगी शाळेत शिक्षणसेवक पदावर कार्यरत होते. १ जानेवारीपासून त्यांना शिपाईपदाची मान्यता मिळाल्याने सेवेत घेण्यात आले आहे. मात्र गेल्या नऊ महिन्यांत त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन मिळालेले नाही. हे वेतन मिळण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी शाळेमार्फत शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवला आहे. सदर प्रस्ताव मंजुरीसाठी त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक साळवे याची भेट घेतली असता त्याने हा प्रस्ताव मंजूरीच्या मोबदल्यात ५० हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्याने ही कारवाई करण्यात आली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी करीत बुधवारी (दि. १३) शिक्षण उपसंचालक कार्यालयात सापळा लावत संशयितास पंचांसमक्ष लाच स्वीकारतांना रंगेहात पकडून अटक केली. ही कारवाई अधिक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर अधिक्षक माधव रेड्डी व उपअधिक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक अनिल बडगुजर, पोलिस नाईक मनोज पाटील, दीपक पवार व अंमलदार शितल सुर्यवंशी आदींच्या पथकाने केली.

Web Title: Bribe Case Clerk in the office of the Deputy Director of Education in the network of ACB

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here