महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय? अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
Breaking News | Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा.
मुंबई: अर्थमंत्री अजित पवार विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना, मुलींचे मोफत शिक्षण, बेरोजगारांसाठी योजनांची घोषणा केली.
अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना मी घोषित करत आहे. महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंब, सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटींचा निधी दिला जाईल. जुलै 2024 पासून अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.”
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना
लाभार्थी : 21 ते 60 वय असलेल्या महिला
अट : वर्षाला आवक 2,50,500 पेक्षा कमी
या योजना अंर्तगत लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रति माह दिले जाण्याची शक्यता आहे. कमीतकमी 3.50 कोटी महिलांना फायदा होण्याची आशा आहे.
अर्थसंकल्पातील इतर महत्त्वाचे मुद्दे
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री लाडकी बेहना या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा. मुख्यमंत्री
लाडकी बहीण योजना लागू करत आहोत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी 21-60 वयोगटातील महिलांना दर महिना दीड
हजार रुपये दिले जातील. जुलै 2024 पासून ही योजना सुरू करणार असून, यासाठी 46 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहेत.
मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्नाची मर्यादा तसंच आर्थिक
दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना पदवी शिक्षणासाठी 100 टक्के शुल्क माफ
पालखी मार्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री व्यवस्थापन, निर्मल वारीसाठी 36 कोटी रुपये वितरित
प्रति दिंडी 20 हजार रुपये दिले जाणार, मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार
स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध असतो. गॅस सिलेंडर घराला परवडेल यासाठी पात्र
कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना कायम करणार
गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपये अनुदान सुरू राहील
कापूस, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी पाच हजार रुपये देणार
Web Title: Breaking News Lek Ladaki Yojana Maharashtra Budget 2024
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study