Home अकोले अकोले: घाटघटरच्या तरुणांकडून दूर्मिळ गिधाडाला जिवदान

अकोले: घाटघटरच्या तरुणांकडून दूर्मिळ गिधाडाला जिवदान

भंडारदरा: घाटघर येथील दोन आदिवासी तरुणांनी दोन वर्ष वयाच्या गिधाडाला जिवदान दिले असुन हा गिधाड भंडारदरा येथील वनविभागाच्या विश्रामगृहाच्या आवारात सुरक्षितरित्या पाहुणचार घेत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पांजरे गावाच्या शिवारात सकाळी साडे नऊ वाजता एका वन्यप्राण्याच्या पाठीमागे दोन कुत्रे मागे लागल्याचे घाटघर येथील हरीश खडके, अंकूश गांगड व संतोष खडके या तरूणांना दिसून आले. या युवकांनी तात्काळ कुत्र्यांची हकालपट्टी करत सदर प्राण्याला कुत्र्यांच्या तावडीतुन जिवदान दिले. सदर वन्यप्राणी हा गिधाड असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते शेंडी आणत वनविभागाच्या महेंद्र पाटील व सचिन धिंदळे यांच्या स्वाधिन केले. सदर गिधाड हे गारठलेले असल्या कारणाने त्याला उडताही येणे शक्य नसल्याने त्याला  उबेची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला उबदार हॉलमध्ये ठेवण्यात आले. शेंडीच्या पशुवैद्दकीय अधिकारी नेहे ताई व डॉ. देशमुख यांनी सदर गिधाडावर उपचार केले. वनविभागाच वनपरिक्षेत्र अधिकारी डी.डी.पडवळे यांनी गिधाडाला काही दिवसानंतर निसर्गाच्या पुन्हा स्वाधीन करणार असल्याचे सांगितले.

गिधाडाची उपजिवीका ही मेलेल्या जनावरांवर होते. स्वच्छतादुताचे ते काम करत असुन निसर्गाचे संवर्धन करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा असतो. परंतु यावर्षी भंडारदऱ्याच्या अभयरण्यात यावर्षी गिधडांची संख्या आढळून आली नाही. काही दिवसांपुर्वी भंडारदऱ्याच्या अभयरण्याच्या परिसरात एका विचीत्र रोगाने अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावताना त्यावर विषारी प्रयोग केले असल्याने आपोआपच गिधाडांचाही ऱ्हास होत गेल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Website Title: Breaking News Akole: Jivadan From The Ghatghoter Youth

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here