Home महाराष्ट्र शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

Branch engineer arrested for taking bribe

शेगाव – नवबौद्ध जातीच्या विकास योजनेतून केलेल्या कामाचे पैसे अदा करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समिती मधील शाखा अभियंता पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड (वय ५७) रा. सूटाळा यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचायत समितीमध्ये अटक केली.

सन २०२१-२० मध्ये सांगवा गट ग्रामपंचायत अंतर्गत एक फळ येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजने अंतर्गत हायमास्ट लाईट लावण्याचे काम घेतले आहे. ते काम २०२० मध्ये पूर्ण झाले.त्या कामाचे देयक १ लाख ४३ हजार ७०० रुपये लाचेची मागणी शाखा अभियंता गायकवाड याने केली. तडजोडीत ७,००० रुपये स्वीकारले. लाच द्यायची नसल्याने तक्रार कर्त्याने लाचलुचपत विभागाकडे धाव घेत तक्रार दिली. लाचलुचपत पथकाने खामगाव येथील सुटाळा खुर्द येथील रहिवासी पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड यांना अटक केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपआधीक्षक आर.एन.मलघने पोलीस नाईक विलास साखरे,रविद्र दळवी,विजय मेहेत्रे, चालक अरशद शेख यांनी केली. पूढील तपास करीत आहेत.एसीबी ने सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात लाच मागणाऱ्याविरोधात ही कारवाई केली आहे. सोमवारी लोणार तालुक्यात लाच प्रकरणी तलाठ्याविरोधात कारवाई झाल्यानंतरची ही दुसरी कारवाई आहे.

Web Title – Branch engineer arrested for taking bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here