Home अहमदनगर अहिल्यानगर: गाठोड्यात बांधलेला मुलाचा मृतदेह नदीत आढळला

अहिल्यानगर: गाठोड्यात बांधलेला मुलाचा मृतदेह नदीत आढळला

Breaking News | Ahilyanagar: चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना.

boy's body was found tied in a knot in the river

कोपरगाव: एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. सदर बालहत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कोणी आणि का केली? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणीपात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली.

 पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. सदर गाठोड्याला बाहेर काढून बघितले असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वर्ष वय असलेल्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर बालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अमित खोकले यांच्या णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाची चक्रे फिरवणार आहेत. घटनास्थळी शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनीही भेट दिली आहे. नेमका हा प्रकार काय? सदर बालकाची हत्या झाली तर ती कोणी आणि कशासाठी केली असावी? अशा प्रकारची चर्चा असून याबाबत खरी माहिती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: boy’s body was found tied in a knot in the river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here