Home महाराष्ट्र प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून हत्या, धक्कादायक घटना!

प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून हत्या, धक्कादायक घटना!

Breaking News | Satara Crime:  प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर.

Boyfriend kills girlfriend by pushing her off a building

सातारा: साताऱ्यामध्ये  प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरून ढकलून दिले आहे. यामध्ये या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तरुण देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यातील मलकापूरमध्ये ही घटना घडली आहे.

आरुषी मिश्रा असे मयत तरुणीचे नाव आहे. तर ध्रुव छिक्कर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. हे दोघेही कृष्णा मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते, ते दोघेही उत्तर भारतीय असल्याची माहिती आहे. वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 31 जुलै रोजी आरुषी आणि ध्रुवमध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले होते. संतापाच्या भरात ध्रुवने आरुषीला बिल्डिंगवरून खाली ढकलून दिले. यामध्ये आरुषीचा मृत्यू झाला, तर मारहाणीत ध्रुवदेखील गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला तरुणीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नंतर पोलिस तपासात हत्या झाल्याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी 1 ऑगस्ट रोजी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Boyfriend kills girlfriend by pushing her off a building

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here