Home महाराष्ट्र रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून मुलगा जागीच ठार

रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून मुलगा जागीच ठार

Breaking News | Tractor Accident: रस्त्यावर रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षांचा मुलगा जागीच ठार.

Boy dies on the spot after being hit by tractor-trolley while playing Rangpanchami

भोज : रस्त्यावर रंगपंचमी खेळत असताना ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून नऊ वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला. हा अपघात बारवाड येथे कारदगा रस्त्यावर काल सकाळी ६.३० च्या दरम्यान झाला. प्रज्वल बाळासो पाटील (वय नऊ) असे मृत मुलाचे नाव आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, रंगपंचमीनिमित्त गंगानगर (बारवाड) येथे बारवाड-कारदगा रस्त्यावर मुले रंग खेळत होती. सकाळी ६.३० च्या दरम्यान मांगूरकडून कारदगाकडे ट्रॅक्टर-ट्रॉलीतून मळी घेऊन जात होता. यावेळी प्रज्वल पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली सापडला.

ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रंग खेळणारी अन्य मुले व गल्लीतील लोक आणि कुटुंबीय त्वरेने अपघातस्थळी आले. तोपर्यंत तो मृत झाला होता. मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडील व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. ही बातमी गावात पसरताच सर्व लोक घटनास्थळी धावले.

यावेळी डोक्यावरून चाक गेलेल्या मुलाचा मृतदेह पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतूनही अश्रू आले. चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले, सदलगाचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह निपाणी येथील गांधी हॉस्पिटलला उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.  या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Boy dies on the spot after being hit by tractor-trolley while playing Rangpanchami

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here