वादळाच्या भोवऱ्यात सापडून आठ वर्षीय मुलगा विहिरीत पडून मृत्यू(died) झाल्याची घटना.
नाशिक: महाजनपूर (ता. निफाड) येथे वादळाच्या भोवऱ्यात सापडून आठ वर्षीय मुलगा विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल वसंत फड असे त्या मुलाचे नाव आहे. तो व त्याचा लहान भाऊ अक्षय (६) शेतात खेळत होते. आजोबांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. परंतु, घरी जात असताना वादळात राहुल विहिरीच्या दिशेकडे लोटला गेला आणि विहिरीत पडला.
Web Title: boy died after falling into a well during the storm
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App