Breaking News | Nashik Crime: पीडितेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत पीडितांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर वारंवार त्यांच्यावर बलात्कार (Rape), या घटनेने महिलांच्या अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे.
नाशिक : शहरामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये संशयितांनी पीडितेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत पीडितांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर वारंवार त्यांच्यावर बलात्कार केला. तर, अन्य दोन घटनांमध्येही संशयितांनी पीडितेशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला.
पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजिद इब्राहिम शेख (रा. जेबा मॅरेज हॉलजवळ, नांदेड) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, एप्रिल २०२२ ते मार्च २०२४ या दरम्यान संशयिताने पीडितेला लग्नाचे वारंवार आमिष दाखवून शहरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार (Rape) केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूरमधील श्रमिकनगर येथे पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. पीडिते गर्भवती राहिली असता, गर्भपाताचा गोळ्या देत गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच, वाच्यता केल्यास पीडितेच्या बहिणीलाही असेच करण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयित सौरभ शेवाळे (रा. वृंदावननगर, सातपूर) याच्याविरोधात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, ३ ते १५ जानेवारी २०२४ या दरम्यान सदरचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, एकाच कार्यालयात काम करीत असल्याचा गैरफायदा घेत संशयिताने पीडितेचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. सागर रामदास वाघ (रा. माऊली लॉन्सजवळ, कामटवाडे) असे संशयिताचे नाव आहे.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, २९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता सदरचा प्रकार राजीव गांधी भवनसमोर असलेल्या कार्यालयात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड गावातील शिंदे चाळीत राहणार्या पीडित अल्पवयीनचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित जितेंद्रकुमार रामजवाहिर कुमार (२०, रा. अंबडगाव, नाशिक. मूळ रा. नौली जि. सुलतानपूर उत्तरप्रदेश) याच्याविरोधात पोस्कोसह विनयभंगाचा (Molested) गुन्हा अंबड पोलिसात दाखल केला आहे. संशयिताला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, सदरचा प्रकार गुरुवारी (ता. २८) घडला होता.
Web Title: Both were abused in Nashik
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study