Home अहिल्यानगर कोरोनाच्या उपचारासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले मात्र कर्ज फेडता न आल्याने

कोरोनाच्या उपचारासाठी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले मात्र कर्ज फेडता न आल्याने

Borrowed from a private lender for the treatment of corona

Ahmednagar News Live | कर्जत | Karjat: कोरोनाच्या (Corona) लाटेत अनेकांना कर्ज काढण्याची वेळ आली. बारामती येथील एका नागरिकाने नगरच्या कर्जत तालुक्यातील एका खासगी सावकाराकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पुढे या सावकाराने दरमहा वीस टक्के व्याज लावून ४० हजारांचे १ लाख ३६ हजार रुपये झाल्याचे सांगितले. पैसे वेळेवर देता न आल्याने त्यांनी बुलेटही ताब्यात घेऊन ठेवली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात खासगी सावकार सचिन माने (रा. भांबोरे, ता. कर्जत) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेंद्र रवींद्र काजळे व त्यांची पत्नी (रा. तांदुळवाडी ता.बारामती) यांना डिसेंबर २०२० मध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने उपचारासाठी पैशांची गरज असल्याने कोणाकडे पैसे मिळतील का?  हे पहात असताना त्यांच्या ओळखीचे संभाजी जाधव यांनी त्यांचे (भांबोरे ता. कर्जत) येथील नातेवाईक सचिन माने यांच्याशी काजळे यांची ओळख करून दिली. पैशांची गरज असल्याने सचिन माने यांनी काजळे यांना १५ डिसेंबर २०२० रोजी ४० हजार रुपये महिन्याला २० टक्के व्याजदराने दिले. त्यानंतर काजळे यांनी दोन महिन्याचे १६ हजार रुपये रोख परत केले होते. त्यानंतर ३१ मार्च २०२१ रोजी चतुर्थीनिमित्त काजळे बारामतीहून सिद्धटेक येथे गणपती दर्शनासाठी आले होते. त्यावेळी माने याने काजळे यांची बुलेट (एम. एच ४२ ए. व्ही. ६००९) ही गाडी भांबोरे गावातून जात असताना आपल्या चप्पलांच्या दुकानासमोर अडवली. माने यांनी पैशाची मागणी केली. त्यावर काजळे यांनी एक महिन्याच्या आत पैसे देऊन टाकतो असे सांगितले. मात्र, ‘मला तुझ्यावर विश्वास नाही. तू माझे पैसे आणून दे आणि मगच तुझी गाडी घेऊन जा’ असे म्हणत काजळे यांच्याकडून गाडी हिसकावून घेतली.

नंतर काजळे यांच्याकडे पैसे आल्यावर जून २०२१ मध्ये ते ५० हजार रुपये घेऊन माने याच्याकडे आले. पैसे घेऊन बुलेट परत करण्याची त्यांनी मागणी केली. असता माने याने अगोदर दिलेली ४० हजार, त्यावर आजपर्यंत झालेले ९६ हजार व्याज असे एकूण १ लाख ३६ हजार दे आणि मगच बुलेट घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतरही पैशांची जमवाजमव करून ५६ हजार देतो, असा फोन काजळे यांनी केला. मात्र, संपूर्ण पैसे घेतल्याशिवाय बुलेट देणार नाही, अशी माने याने भूमिका घेतली. अखेर काजळे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली यावरून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Borrowed from a private lender for the treatment of corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here