मोठी बातमी: पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी
Pune | पुणे: दोन दिवसापूर्वी पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी (threat) एका इसमाने दिली होती. त्याने बॉम्बची धमकी देऊन पैशाची मागणी केली होती. यामुळे पुणे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची पूर्ण खबरदारी घेत बॉम्बने उडवून देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगावाचा रहिवासी असलेला प्रभू कृष्णा सूर्यवंशी वय २२ असे अटक केलेल्या आरोपीच नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी प्रभू कृष्णा सूर्यवंशीने दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. सूर्यवंशीने गूगल व्हॉईस सर्चवरुन पुणे पोलीस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधला होता. त्यानंतर त्याने पुणे पोलिसांना फोन करुन धमकी दिली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी सूर्यवंशीला अटक केली. यापूर्वीही सूर्यवंशीने राजकीय नेते आणि उद्योगपतींना धमकावले होते. आरोपी सूर्यवंशी विरोधात यापूर्वीही गावदेवी पोलीस ठाणे व वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेले आहेत.
Web Title: Bomb threat to blow up Pune railway station