पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल, एकच खळबळ, शोधकार्य सुरू
Breaking News | Pune: पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीकडून पोलिस नियंत्रण कक्षात कॉल आल्यामुळे या भागात एकच खळबळ, बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने संपूर्ण हॉस्पिटल पिंजून काढलं मात्र त्यांना कुठेही बॉम्ब अथवा संशयस्पद वस्तू आढळली नाही आणि त्यानंतर हा कॉल फेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीकडून पोलिस नियंत्रण कक्षात कॉल आल्यामुळे गुरुवारी रात्री या भागात एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाकडून हॉस्पिटलच्या परिसरात रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते.
पूना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा कॉल रात्री नियंत्रण कक्षात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि बीडीडीएसचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बीडीडीएस पथक आणि पोलिसांकडून हॉस्पिटल परिसरात रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने संपूर्ण हॉस्पिटल पिंजून काढलं मात्र त्यांना कुठेही बॉम्ब अथवा संशयस्पद वस्तू आढळली नाही आणि त्यानंतर हा कॉल फेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
आज (2 फेब्रुवारी) पुन्हा एकदा पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे कॉल आले. त्यावर पोलिसांनी त्या त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला मात्र या अफवा असल्याचे निष्पन्न झालं. परंतु पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेल्या या फोन कॉल नंतर पोलीस सतर्क झाले आहे. आजही ज्या ठिकाणी बॉम्ब आहेत, असे फोन आले होते त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारे फोन कॉल्स करून अफवा पसरवणाऱ्यांवर इथून पुढे कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
Web Title: Bomb call in Poona hospital, search underway
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study