नगरच्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ला बेड्या
Breaking News | Pune: बोगस डॉक्टर, गेल्या पाच वर्षांत त्याने अनेक रुग्णांवर उपचार केल्याचे स्पष्ट झाले.
पुणे : लोणी काळभोर येथील एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गेली पाच वर्षे प्रॅक्टिस करणारी ही व्यक्ती केवळ दहावी पास आहे.
त्याच्या क्लिनिकमध्ये रुग्णांना अॅडमिट करण्यासाठी एक बेडही आढळून आला आहे. प्रकाश तोरणे (६३, रा. कदमवाक वस्ती, मूळ श्रीरामपूर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याला अटक केली आहे. गेल्या पाच वर्षांत त्याने अनेक रुग्णांवर उपचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जनसेवा नावाने कदमवाक वस्ती येथे चालवत असलेल्या त्याच्या क्लिनिकमध्ये रुग्णांच्या रांगा लागत होत्या. एका जागरूक नागरिकाने त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती महापालिकेला दिली होती. यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने त्याचा पर्दाफाश केला.
Web Title: Bogas Doctor Bedya to ‘Munnabhai MBBS’ of Nagar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study