Home नांदेड मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, सकल मराठा समाजाची भूमिका

मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, सकल मराठा समाजाची भूमिका

Maratha Reservation:  सभा सुरु असताना मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या सुरूच आहे. नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे.

body will not be taken into custody until the demands are accepted, the stance of the entire Maratha Reservation

नांदेड: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे. यासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभर सभा घेत असून सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मात्र एकीकडे आरक्षणासाठी आंदोलने,  सभा सुरू असताना मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्या सुरूच आहेत. रविवारी नांदेडमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केली असून सकल मराठा समाजाने मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

मयताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 50 लाखाची मदत , मयत युवकाच्या बहिणीला शासकीय नोकरी , कुटुंबाला घरकुल, या मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाजाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले असून मराठा आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वडगाव येथील ही घटना आहे. येथील 24 वर्षीय शुभम पवार या तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिट्टी लिहली असून या चिट्टीत, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. एक मराठा लाख मराठा , मराठा आरक्षणासाठी मी माझ्या जीवाचे बलिदान देत आहे. माझे बलिदान वाया जाऊ नये असा आशय त्या चिट्टीत आहे.

Web Title: body will not be taken into custody until the demands are accepted, the stance of the entire Maratha Reservation

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here