तोंडावर कापड, तर दोरीने बांधलेले हात-पाय, 30-35 फूट खोल दरीत तरुणाचा मृतदेहआढळला
Dhule-Surat Highway : 30-35 फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ.
धुळे: धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील 30-35 फूट खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. त्या मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह अशी दिसून आली. त्यावरून निर्दयतेने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
तोंडावर कापड, तर दोरीने बांधलेले हात-पाय, आशा स्थितीत काटेरी झुडपात मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, चार दिवसांपूर्वी हत्या करून टाकून दिला असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. बेपत्ता तरुणाचे नाव सईद चिराग शाह अशल्याचे समजतये. हा वय 32 वर्षीय तरूण विसरवाडीया येथील असल्याचे फोटोवरून स्पष्ट झालेय. सईद शाह 8 जानेवारीपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी साक्री पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. कोंडाईबारी घाटात चार दिवसांनंतर त्याचा मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
साक्री पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेमागील कारण आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे. घटनेमुळे विसरवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Web Title: body of the young man was found in a ravine 30-35 feet deep
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News