Home औरंगाबाद गोदावरी नदीत आढळला हॉटेल व्यवसायिकाचा मृतदेह

गोदावरी नदीत आढळला हॉटेल व्यवसायिकाचा मृतदेह

Breaking News | Sambhajinagar: एका हॉटेल व्यवसायिकाचा मृतदेह नदीत आढळला.

Body of hotelier found in Godavari river

पैठण : पैठण येथील गोदावरी नदीच्या पाण्यात पैठण एमआयडीसी परिसरातील एका हॉटेल व्यवसायिकाचा मृतदेह आज (दि.२८) रोजी आढळून आला. राजू माणिक शिंदे (वय ४८ रा. पेपर मिल समोर, एमआयडीसी पैठण) असे या हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून या त्यांनी जीवन का संपविले यासंदर्भात पैठण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, , शनिवारी पैठण येथील पैठणी साडी केंद्राच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांना मिळाली. त्यांनी तात्काळ सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस जमादार दिनेश दांडगे, नरेंद्र अंधारे यांना घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठविले. नदीत तरंगत असलेला मृतदेह पाण्याबाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयात ठेवण्यात येऊन पैठण पोलिसाने आजूबाजूच्या परिसरातील बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला असता पैठण एमआयडीसीतील पेपर मिल समोरील हॉटेल व्यावसायिक राजू माणिक शिंदे हे गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना रुग्णालयात बोलून मृतदेह दाखविला असता हा मृतदेह राजू शिंदे यांचा असल्याची खात्री नातेवाईकांनी केली. पैठण पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून या व्यक्तीने जीवन का संपविले.

याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार एस.आर चेडे हे करत आहेत.

Web Title: Body of hotelier found in Godavari river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here