Home संगमनेर संगमनेरात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

संगमनेरात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

body of an unidentified youth was found at Sangamner 

संगमनेर | Sangamner: नाशिक-पुणे महामार्गावरील स्लीपरोडवर घुलेवाडी शिवारात एका 20 ते 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, आहे. या तरुणाच्या चेहर्‍यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने त्याचा घातपात की अपघात याबाबत नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु आहे.

घुलेवाडी शिवारात गट सर्वे नंबर 37 मधील सुनिल धोंडीबा राऊत यांच्या शेताच्या पश्चिमेस नाशिक-पुणे महामार्गावरील स्लीप रोडवर काल सकाळी एका 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत शहर पोलिसांना माहिती कळविल्याने पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर तरुणाच्या अंगात काळेपांढरे चौकटीचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, पायात सॅन्डल घातलेला तसेच छातीवर व डोक्यावर गंभीर स्वरुपाच्या जखमा दिसून आल्या. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या खबरीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  याबाबत पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: body of an unidentified youth was found at Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here