अहिल्यानगर: शीर, हात नसलेला तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला
Breaking News | Ahilyanagar: शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह.
श्रीगोंदा : शीर, दोन्ही हात, एक पाय नसलेल्या एका अनोळखी तरुणाचा मृतदेह दाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील विहिरीत बुधवारी (दि. १२) सकाळी आढळला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे घेतली. धाव
हा मृतदेह वीस वर्षीय तरुणाचा असावा. त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी श्रीगोंदा-शिरुर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या दाणेवाडी शिवारातील विहिरीत मृतदेह टाकला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विहिरीत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. हा मृतदेह कोणाचा आहे याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह अपर पोलिस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. मात्र, या मृतदेहाला शीर नसल्याने ओळख पटलेली नाही.
वीस वर्षीय तरुणाचा मृतदेह असावा असा अंदाज आहे. अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष भंडारी घटनास्थळी दाखल झाले. दाणेवाडी येथील विठ्ठल दगड्डू मांडगे यांच्या मालकीची ही विहीर आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. हा तरुण नेमका कोणत्या गावातील आहे, त्याची हत्या नेमकी कोणी, कोठे, व का केली, असावी या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी गावातील एक तरुण बेपत्ता
दाणेवाडी येथील एक वीस वर्षीय तरुण बेपत्ता असल्याची माहिती आहे. तो शिरुर येथील सीटी बोरा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.
Web Title: Body of a young man without head and arms found in a well