Home नाशिक कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं

कचरा डेपोत आढळला मृतदेह; खुनाच्या घटनेनं नाशिक हादरलं

Breaking News | Nashik Murder Case:  कचरा डेपो समोरील जागेत ३० वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली.

Body Found in Garbage Depot The incident of murder 

नाशिक :  नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौळाणेजवळ असलेल्या कचरा डेपो समोरील जागेत ३० वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांचे पथक दाखल झाले आहे. फॉरेन्सिक पथकाचा पंचनामा सुरू आहे. योगेश बत्तासे (रा. नांदगाव) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

प्रेमप्रकरणातून किंवा काहीतरी वादातून अज्ञातांनी हा खून केल्याचे समाेर आले असून, मारेकऱ्यांच्या शाेधार्थ पथके रवाना करण्यात आली आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बत्तासे (वय ३१, रा. नांदगाव, जि. नाशिक) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी(दि. ८) रात्री इंदिरानगर पोलीसांच्या हद्दीतील खत प्रकल्पासमोरील बाजूस युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. पांडवलेणीच्या मागच्या बाजूस असलेल्या खतप्रकल्पा समोरील निर्जन ठिकाणी हा खून का व कुणी केला याबाबत अजूनही पुरेशी माहिती समाेर आली नसली तरी प्रेम प्रकरणातून अथवा घरगुती वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Web Title: Body Found in Garbage Depot The incident of murder 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here