धक्कादायक! महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ
Breaking News | Pune Crime: महिलेसह दोन लहान चिमुकल्यांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले.
पुणे : पुणे जिल्हातील रांजणगाव परिसरात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. महिलेसह तिच्या दोन लहान चिमुकल्यांचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. तिघांची हत्या करून त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गवर असणाऱ्या रांजणगाव खंडाळे परिसरात ग्रोव्हेल कंपनीच्या मागील बाजूस महिलेसह तिच्या दोन लहान मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षे आहे. तर तिच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आहे. तिच्यासोबत आढळलेल्या मुलांचे वय अनुक्रमे चार वर्षे आणि दीड वर्षे आहे. या तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही.
महत्वाचे: नवनवीन अधिक बातम्या मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती रांजणगाव पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Breaking News: bodies of a woman and two children were found burnt, causing a stir