पदवीधर निवडणूकीच्या मतमोजणीनंतर मंडळ अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Amravati Graduate Constituency Election: निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मंडळ अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Dies).
अमरावती: अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुरुवारी दिवसभर मतमोजणी केल्यानंतर खडसेंना छातीदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी प्राण गमावले.
अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी आक्रित घडलं. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी येथील मंडळ अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. शाहूराव खडसे असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
काल (गुरुवार २ फेब्रुवारी) दिवसभर निमानी गोडाऊन याठिकाणी अमरावती पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली होती. रात्री मंडळ अधिकारी शाहूराव खडसे यांना छातीत दुखत होते. शाहूराव यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्री उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र ते घरी गेले तेव्हा त्यांची तब्येत बिघडली, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Board officer dies of a heart attack after counting of votes for graduate elections
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App