अकोले तालुक्यात जमिनीच्या वादातून रक्तरंजीत हाणामाऱ्या, सहा जखमी, ९ जणांवर गुन्हे- Crime
Akole Crime | अकोले: शेताच्या बांधावरून जुना वाद असताना माझा बांध का कोरला? या कारणावरुन सुगाव खुर्द येथे दोन गटात रक्तरंजीत हाणामारी झाली. भाऊबंदकीतील हा वाद एकमेकांच्या जीवावार बेतला. या भीषण हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी नऊ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अकोले पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे.
याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी संतोष राधाकिसन वैद्य (वय ३०. रा. सुगाव खुर्द) यांचे सर्व्हे नं. ६ मध्ये व इतर ठिकाणी त्यांचेच भावबंध सोपान कृष्णाजी वैद्य यांच्यासोबत मागील दहा ते पंधरा वर्षापासून बाद आहे. या वादातून यापुर्वी या दोन्ही कुटूंबात बाद होत होते. दरम्यान १४ जून रोजी सायंकाळी फिर्यादी केली, संतोष वैद्य याने आरोपी सोपान वैद्य यास माझा बांध का कोरला? म्हणून विचारणा केली. यावेळी आरोपीने तुझा या शेतीशी काही संबंध नाही, तू आमच्या नादाला लागू नको, नाहीतर तुम्हाला जीवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. दरम्यान हा वाद यावेळी शांत झाला. परंतू दि. १७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी संतोष वैद्य व त्यांचा पुतण्या शुभम मारुती वैद्य हे ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत असताना त्याठिकाणी आरोपी सोपान वैद्य, लहान सोपान बैद्य (सर्व रा. सुगाव खुर्द) यांनी फिर्यादीला तेथे शेती करण्यास मज्जाव करीत फिर्यादीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी विमल सोपान वैद्य, रंजना दिनकर वैद्य उज्ज्वला लहानु वैद्य, तेजस लहानु वैद्य, अपूर्वा लहानु वैद्य, सायकली दिनकर वैद्य हे आरोपी हातात लोखंडी रॉड, काठ्या व मिरची पावडर घेऊन आले. या आरोपींनी फिर्यादी व साक्षीदारांच्या डोळ्यात मिरची टाकत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी सोपान, दिनकर, लहानू यांनी लोखंडी रॉडने व काठ्यांनी संतोष वैद्य यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.
यावेळी मध्ये पडलेल्या शुभम यास देखील डोळ्यात मिरची पावडर टाकून लोखंडी रॉडने व काठीने बेदम मारहाण केली. या रक्तरंजीत हाणामान्या पाहूण हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या प्रदिप रामदास वैद्य, रमादास राधाकिसन वैद्य, आशितोष रामदास वैद्य, विमल मारुती वैद्य यांना देखील आरोपांना रॉड व काठ्यांनी मारहाण केली. यात प्रदिप याचे दात पाडून त्याला गंभीर जखमी केले. या रक्तरंजीत हाणामारीत फिर्यादीसह सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. वरील नऊ आरोपींवर अकोले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Bloody fights over land disputes Crime Filed