Home बीड धक्कादायक!  मुलीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत नराधमानं….. बीड पुन्हा हादरलं

धक्कादायक!  मुलीचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करत नराधमानं….. बीड पुन्हा हादरलं

Breaking News | Beed Crime: एका शाळकरी मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस.

Blackmailing a girl abused by taking obscene photos

बीड: बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे महिला दिनी पोलिस कर्मचाऱ्याने एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळकरी मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी परळी येथील संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये पोस्को कायद्यांतर्गत (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण पोस्को कायदा 2012- POCSO ACT) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धीरज रामकिशन कांदे असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात परळी येथील संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधमान अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकलं. मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला असे, फिर्यादीत सांगण्यात आले आहे.

नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी  आपला  अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज 

इतकंच नाही तर नराधमाने पीडित मुलीसोबत अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. संभाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Blackmailing a girl abused by taking obscene photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here