Teachers Constituency Election: कोकण शिक्षक मतदारसंघ भाजपची बाजी
BJP’s victory in Konkan teachers constituency Election Result: भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी.
नवी मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ निवडणुकीतील पहिला विजय हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत.म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आणि भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात सरळ लढत होती. या निवडणुकीत म्हात्रे यांना 20800 मते मिळाली. तर शेकापचे बाळाराम पाटील यांना 9500 मते मिळाली. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 11,300 मताधिक्य घेत आपला विजय नोंदवला आहे. बाळाराम पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. तरीही पाटील यांचा पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
आपल्या विजयानंतर बोलताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलं की, हा विजय सर्व शिक्षकांचा आहे. मला सर्व संघटना आणि पक्षाचा चांगला पाठिंबा असल्याने हा विजय शक्य झाला. शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार, असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
बाळाराम पाटील यांनी पराभवानंतर म्हटलं की, निकाल आलाय तो स्वीकारला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाला आहे. पण त्या मुद्द्याकडे न जाता कोकणच्या शिक्षकांनी जो कौल दिला तो मान्य करतो.
Web Title: BJP’s victory in Konkan teachers constituency Election Result
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App