बिग ब्रेकिंग! सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा, राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा
Nashik Graduate Constituency Election: Satyajeet Tambe, Ahmednagar News; भाजपा पक्षाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला, स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
अहमदनगर: विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आलेला आहे. या जागेसाठी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या सत्यजित तांबे (Satyajeet tambe) यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना माहाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. तांबे यांना भाजपा पक्ष पाठिंबा देणार असे म्हटले जात होते. मात्र अद्याप त्याबाबत घोषणा करण्यात आली नव्हती. असे असतानाच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe Patil) यांनी दिली आहे. ते आज (२९ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपा पक्षाने अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या पातळीवर हा निर्णय झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. “आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार यामुळे कोण बाजी मारणार याबाबत दोन तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
Web Title: BJP’s support to Satyajeet Tambe, Radhakrishna Vikhe Patil’s announcement
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App