Breaking News | Akole | BJP Elections: अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या 6 जागा आणि पंचायत समिती गणाच्या 12 जागा भाजप लढविणार असल्याची घोषणा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.

अकोले – अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद गटाच्या 6 जागा आणि पंचायत समिती गणाच्या 12 जागा भाजप लढविणार असल्याची घोषणा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली. अकोले येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव आभाळे, गिरजाजी जाधव, सीताराम देशमुख, अकोले मंडल अध्यक्ष राहुल देशमुख, कोतुळ मंडल अध्यक्ष बाळासाहेब सावंत, सोमदास पवार, सुनील दातीर, सुधाकर देशमुख, अरुण शेळके, राजू पाटील देशमुख, आनंदराव वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, धनंजय संत, सचिन जोशी, बाळासाहेब वडजे, शरद नवले, सोनाली नाईकवाडी, रेश्मा गोडसे, भाऊसाहेब आभाळे, राजेंद्र डावरे, तुषार सुरपुरीया, बंटी पांडे, अशोक आवारी, राम रुद्रे, सुशांत वाकचौरे, बाबासाहेब उगले, दिलीप हासे, सुधाकरराव आरोटे, शिवाजी अरज, सुभाष उगले, मोसिन शेख, सागर चौधरी, राम तळेकर आदींसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
मा.आ. पिचड म्हणाले की, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आपण पाच मान्यवरांची कोअर कमिटी नेमणार आहोत. पक्ष निरीक्षक इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतील. सर्व अहवाल वरिष्ठांना देतील. एकदा पक्षाकडून उमेदवार निश्चित झाल्यानंतर सर्वांनी पक्षादेश मानून एकजुटीने काम करून आपले भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणावेत. आपल्याला भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष करायचा आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवून काम करावे. अकोले तालुक्यातील सर्व जागा भाजपच्या आल्यानंतर आपला भाजपचा जि.प. अध्यक्ष होऊ शकतो. सुनीताताई भांगरे आणि दिलीप भांगरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चेसाठी बोलावले होते. ती सर्व चर्चा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर घालणार आहेत.
त्यानंतर सुनीताताई भांगरे आणि दिलीप भांगरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. ही माहिती सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे, म्हणून ही बैठक बोलावली आहे. पक्षश्रेष्ठी ज्यांना उमेदवारी घोषित करतील ते भाजपच्या कमळ चिन्हावर लढतील, त्या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली राहणार आहे. या वेळी शिवाजीराजे धुमाळ यांनी मागील जि.प. व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे तीन जि.प. सदस्य व चार पंचायत समिती सदस्य निवडून आल्याची आठवण करून दिली. सुनीताताई भांगरे ह्या त्यावेळी भाजपच्याच होत्या, हे स्पष्ट केले. यापुढे आपणास बेरजेचे राजकारण करावे लागेल. जे आपल्याबरोबर येतील ते कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील हे स्पष्ट केले. सीताराम भांगरे यांनी निवडणूक प्रक्रिया कशी राहील व उमेदवार निवड कशी राहील, याबाबत पक्षाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
Breaking News: BJP will contest on its own in Akole taluka Elections
















































