Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यातील या आमदाराची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

अहमदनगर ब्रेकिंग: जिल्ह्यातील या आमदाराची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

Ahmednagar breaking:  माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते (BJP MLA Babanrao Pachpute) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेत टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

BJP MLA Babanrao Pachpute was admitted to a private hospital in an ambulance

अहमदनगर: माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती खालावल्याने  त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेत टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बबनराव पाचपुते  यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला. बबनराव पाचपुते मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत. सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावरही कमी झाला आहे. मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात  आले आहेत.

बबनराव पाचपुतेंना आज त्रास सुरु झाल्यावर त्यांच्या सहकार्‍यांनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेण्यात आले.. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तुर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली.

जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation.  भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC.  सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.

Web Title: BJP MLA Babanrao Pachpute was admitted to a private hospital in an ambulance

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here