Home महाराष्ट्र भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना करोनाची लागण

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना करोनाची लागण

Bjp Leader Narayan Rane Corona positive

भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. तसेच गेल्या दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतः ची काळजी घ्यावी असे त्यांनी म्हंटले आहे.

“माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल”. असे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलेले आहे.

याअगोदर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांना करोनाची लागण झाली होती. काही दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांना देखील करोनाची लागण झाली होती.

करोनाने आत्तापर्यंत बड्या बड्या नेत्यांना घेरले आहे. राज्यातील आमदार, मंत्री, खासदार यांना देखील करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Bjp Leader Narayan Rane Corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here