Home पुणे वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

वाढदिवसाची पार्टी ठरली अखेरची, भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

Pune Accident: वाढदिवसाची पार्टी करून माघारी चाललेल्या मित्रांना अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू.

birthday party turned out to be the last, terrible accident, two people died

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला. वाढदिवसाची पार्टी करून माघारी चाललेल्या मित्रांना असा अपघात होईल याची कल्पनाही नव्हती. गाडीमध्ये असलेल्यस सहापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय.

वाढदिवसाची पार्टी करून परतत असताना, तरुणांचा भीषण अपघात झाला आहे. पुण्यातल्या वडगाव ब्रिजच्या टर्निंग ला स्विफ्ट कारने एका थांबलेल्या बसला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात गाडीत असलेल्या सहा जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर इतर पाच जण एक गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी जाऊन नजदिकच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी दाखल केला आहे तर पुढील तपास सिंहगड रोड पोलीस स्टेशन करत आहे.

आज दिनांक 25/01/2025 रोजी सकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास वडगाव ब्रिज मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आयशर बस क्रमांक MH 14 GD 7605 हिस स्विफ्ट कार नंबर MH 12 KW 3663 या कारने मागील बाजूने धडक देवून अपघात झाला आहे. सदर अपघातामध्ये , यातील जखमी 2,3,4 हे सिल्वर बर्च हॉस्पिटल नरे पुणे येथे व जखमी 5,6 हे जुपिटर हॉस्पिटल बाणेर येथे पुढील उपचार घेत आहेत. बस चालक यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: birthday party turned out to be the last, terrible accident, two people died

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here