Home Accident News संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Sangamner News: पुण्याहून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असतांना आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार महामार्गाच्या कठड्याला जाऊन धडकल्याने अपघातात (Accident) दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना.

Bike rider dies in accident on Nashik Pune highway

संगमनेर:  पुण्याहून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असतांना आपल्या दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीस्वार महामार्गाच्या कठड्याला जाऊन धडकला. या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटाजवळील पोखरी बाळेश्वर फाटा येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र दिघे (वय ३०, रा. सोनगाव बुद्रूक, ता. राहुरी) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एमएच १७ सी ०३२०३ यावरून पुणेहून संगमनेरकडे येत होते. दरम्यान पोखरी बाळेश्वर फाटा येथे दिघे यांची दुचाकी कठड्याला धडकल्याने भीषण अपघात घडला यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Bike rider dies in accident on Nashik Pune highway

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here