सात जणांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट! तीन मृतदेह पुन्हा काढले बाहेर
Daund Murder Case: भीमा नदी पात्रात सात जण मृत अवस्थेत सापडले, पाच सख्या भावंडांनी हे हत्याकांड केले. या हत्याकांडातील मृतांचे अंत्यविधी केलेले सात पैकी तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढण्यात आले, चार आरोपींना अटक (Arrested).
पुणे: राज्याला हदरवून सोडणाऱ्या यवत हत्याकाडांबाबत आज पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. पारगाव (ता.दौंड ) येथील भीमा नदी पात्रात सात जण मृत अवस्थेत (Dead bodies) सापडले होते. हे हत्याकांड असून पाच सख्या भावंडांनी हे हत्याकांड (Murder) केल्याचे पोलिसांनी सांगितले. आता पुन्हा या हात्याकांडाला वेगळं वळण लागताना दिसत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या हात्याकांडातील मृतांचे अंत्यविधी केलेले सात पैकी तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढण्यात आले आहेत. हे अंत्यविधी केलेले तीन मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयातील टीमने पुन्हा बाहेर काढले आहेत.
तसेच पुण्याच्या ससून रुग्णालयाचे एक पथक मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी आज यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होते. भीमा नदीपत्रात सापडलेल्या सातही जणांची हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. याप्रकरणी चार आरोपींना देखील पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. याच सात मृतदेहंपैकी तीन मृतदेहाचे शवविच्छेदन आज करण्यात येत आहे.
भीमा नदी पात्रात बुधवारपासून ( ता.१८ ) टप्प्याटप्याने सात मृतदेह आढळून आले होते. सातही जण एकाच कुटुंबातील होते. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची पाच पथके कार्यरत होती. काही पुराव्यांच्या आधारे ही आत्महत्या नसून (Murder) खून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी विविध ठिकाणांवरून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
अशोक कल्याण पवार ( वय ६९ ), शाम कल्याण पवार ( वय ३५ ), शंकर कल्याण पवार ( वय ३७ ) प्रकाश कल्याण पवार ( वय २४ ), आरोपींची बहिण कांताबाई सर्जेराव जाधव ( वय ४५ सर्व रा. ढवळेमळा, निघोज, ता. पारनेर, जि.नगर ) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मोहन उत्तम पवार ( वय ४५ ) संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार ( वय ४० दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड) शाम पंडीत फुलवरे ( वय २८ ), राणी शाम फुलवरे ( वय २४ ) रितेश उर्फ भैय्या ( वय ७ ), छोटू शाम फुलवरे ( वय ५ ) कृष्णा शाम फुलवरे ( वय ३, चौघेही रा. हातोला, ता. वाशी, जि.उस्मानाबाद ) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
Web Title: big update on the murder case of seven people! Three bodies were again taken out
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App