Home अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे

अहिल्यानगर जिल्ह्यात अजित पवारांना मोठा धक्का! ‘या’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचे राजीनामे

Breaking News | Ahmednagar vidhansabha Election 2024: जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला.

Big shock to Ajit Pawar in Ahilyanagar vidhansabha Election 2024

अहिल्यानगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.  अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे व प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व पदे व सदस्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या समवेत अजित पवार गटामध्ये असणाऱ्या सर्व नागवडे समर्थक कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर जिल्ह्यामध्ये अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच या पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी देखील पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर पुन्हा आता महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष यांनी राजीनामा दिला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता. अनुराधा नागवडे या जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका देखील आहेत. काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या देखील त्या जिल्हाध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र महायुतीकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. यामुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे नागवडे समर्थकांचा रविवारी रात्री भव्य मेळावा झाला आणि या मेळाव्यामध्ये सर्व समर्थकांच्या भूमिकेमुळे नागवडे यांनी अजित पवार यांची साथ सोडली आहे.

मागील आठवड्यातच शरद पवार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्या भेटी घेऊन महाविकास आघाडीकडून उमेदवारीची मागणी नागवडे केली होती. त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जाणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.  आता पुढे काय निर्णय होणार याकडे लागून राहिले आहे.

Web Title: Big shock to Ajit Pawar in Ahilyanagar vidhansabha Election 2024

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here