Home नाशिक कांद्याच्या दरात मोठी  घसरण

कांद्याच्या दरात मोठी  घसरण

Onion Market rate | onion prices: गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली.

Big fall in onion prices

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे. तर जास्तीत जास्त दर हा 2 हजार 800 रुपये मिळत आहे.

कांद्याच्या दरात घसरण होण्याचं कारण काय?

नांदगाव, मनमाड, येवला आदी बाजार समित्यांमध्येही कांदा दरात घसरण सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसात 1 हजार 6 ते 2 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. कांदा निर्यातशुल्क तातडीने मागे घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही कांद्याने आपला भाव कायम ठेवली होती. कांद्याचे दर हे 500 ते 6000 प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले होते. मात्र, सध्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी यंत्रणांमार्फत कांद्याची खुलेआम विक्री होत असली तरी त्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून सातत्याने किरकोळ दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो होते. मात्र, सध्या कांदा 2000 प्रति क्विंटल ते 2500 रुपयांच्या आसपास विकत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

Web Title: Big fall in onion prices

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here